आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयित सीसीटीव्हीमध्ये कैद:चोरांचा मोर्चा आता पेट्रोलकडे, इमारतीच्या पार्किंगमधील वाहनांतून पेट्रोल चोरी

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात चोरी, घरफोडीच्या घटना सुरुच असून यात आणखी पेट्रोल चोरीची देखील भर पडल्याचे दिसून येत आहे. असाच एक पेट्रोल चोरीचा प्रकार मुंबईनाका परिसरात उघडकीस आला. चोर पेट्रोल चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात अद्याप कोणी कार मालकाने तक्रार दिली नसली तरी पोलिसांनी संशयित चोराचा शोध सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुंबईनाका परिसरातील एका इमारतीमध्ये पार्किंगच्या ठिकाणी चार चाकी वाहनांतून पेट्रोल चोरी झाल्याची तोंडी तक्रार इमारतीच्या नागरिकाने दिली. पथकाने इमारतीच्या ठिकाणी जाऊन इमरातीच्या पार्किंगमधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणी केली असता एक चोर हातात कॅन आणि नळी घेऊन येत असल्याचे कॅमेरात कैद झाले. पार्किंगमध्ये दहा ते बारा चार चाकी वाहने असल्याने संशयिताने नेमक किती पेट्रोल चोरी केले याची ठोस माहिती मिळाली नाही. कार मालकांनी देखील पोलिसांत लेखी तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ निरिक्षक सुनिल रोहोकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

तक्रार नसली तरी तपास सुरु

इमारतीमधील रहिवाशांनी पेट्रोल चोरीची तक्रार दिलेली नाही. पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या अधारे संशयिताचा शोध सुरु केला आहे. संशयिताकडून पेट्रोल चोरीचे अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...