आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा धुमाकूळ:नाशिकमधील गंगापुरात बंद घर फोडले; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महात्मानगर या भरवस्तीत चोरट्यांनी घर फोडून तिजोरीतून रोख रकमेसह सुमारे साडेतीन लाखांचे सोन्या चांदीच्या दागिने ऐवज लांबवला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मानगर येथील कलप्तरु बिल्डिंगमध्ये राहणारे प्रमोद गणेश कुमार यांच्या तक्रारीनुसार ते कुटुंबासह 19 ते 31 मे या कालावधीत बिहार येथे आपल्या गावी गेले होते. त्याच कालावधीत ही घरफोडीची घटना घडली. बेडरूममधील कपाटातील तिजोरी फोडली. प्रमोद कुमार यांच्या फिर्यादीनुसार ते घरी परतले असता घराबाहेरील कुलुप तोडून घरातील साहित्य फेकलेले दिसून आले. बेडरुममधील तिजोरीचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने चांदीचा मूर्ती व रोकड, असा सुमारे साडे तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले.

परिसरात भीतीचे वातावरण

या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिस तपास करीत आहेत. शहरातील उच्चभ्रू वसाहतीत समजल्या जाणाऱ्या या भागात या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात एबीबी सर्कल जेहान सर्कल बळवंत नगर महात्मा नगर भागात पोलिसांची गस्त होत नसल्याने घरकुल मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...