आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 ते 9 पर्यंत आयाेजन‎:नाशकात यंदा 15 बालनाट्यांची तीन दिवस रंगत‎ ; नाशिक केंद्रावर राज्य बालनाट्य स्पर्धा

नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

११ व्या महाराष्ट्र राज्य‎ बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक‎ फेरी दि. ६, ७ व ९ जानेवारी या‎ कालावधीत प. सा. नाट्यगृह‎ येथे रंगणार आहे. बालनाट्य‎ स्पर्धेत यंदा पंधरा नाटकांची‎ रंगत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन‎ शुक्रवारी (दि. ६) सकाळी‎ ९.३० वाजता होणार आहे.‎ शालेय विद्यार्थ्यांसह नाट्य‎ रसिकांना याचा आस्वाद घेता‎ येईल. या नाटकांचा जास्तीत‎ जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा‎ असे आवाहन सांस्कृतिक कार्य‎ संचालनालयाचे वतीने‎ करण्यात आले आहे.‎

नाटक बघण्यास विद्यार्थांना पाठवावे‎ बालनाट्य स्पर्धेची वेळ ही शासन नियमानुसार‎ ‎ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी‎ ‎ आहे. ही वेळ शाळांच्या वेळेनुसार‎ ‎ आहे. त्यामुळे शाळांनी आपले‎ ‎ विद्यार्थी बालनाट्य पाहण्यासाठी‎ ‎ आवर्जून पाठवावे, असे शासनाचे‎ ‎ पत्र आहे. तसे पत्र आम्ही संबंधित‎ ‎ अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार‎ ही नाटके बघण्यासाठी शाळांनी आपले विद्यार्थी घेऊन‎ यावे . - राजेश जाधव, समन्वयक, नाशिक केंद्र‎‎ दिव्य मराठी विशेष‎

बातम्या आणखी आहेत...