आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव:यंदा 24 ते 28 नोव्हेंबरला नाशकात होणार कृषिथॉन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, चर्चासत्राच्या माध्यमातून समस्यांचे निराकरण, पिकांची मार्केटिंग, प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव करणारे अभिनव व्यासपीठ म्हणून समजले जाणारे कृषिथॉन यंदा २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ठक्कर डोम येथे होणार असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. कृषिथॉनमध्ये यंदा कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्यासह विविध शासकीय संस्थांचा सहभाग राहणार आहे. अॅग्रो इनपुट्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया, नाशिक अॅग्रोडीलर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य नर्सरी संघटना यांचे सहकार्य लाभणार आहे. कृषी क्षेत्राला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कृषिथॉनमध्ये विविध श्रेणीत कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सन्मान करण्यात येणार आहे. यंदा बोल भिडू...कृषिथॉन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...