आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:यंदा हज यात्रेसाठी भाविकांना येणार प्रत्येकी 4 लाख खर्च

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड संसर्गाच्या कारणामुळे यावेळी हज यात्रेसाठी अधिकचा पैसा मोजावा लागणार आहे. २०१९ च्या तुलनेत यात्रेचा खर्च दीड लाखाने वाढविण्यात आला आहे. यावर्षी हज यात्रेकरूंना यात्रेसाठी ३ लाख ८१ हजार ४५० रुपये भरावे लागतील. २०१९ ला हज यात्रेचा खर्च अडीच लाख रुपये होता.

आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, या भावनेने मुस्लिम बांधव अनेक वर्षांपासून पैसा गोळा करून ठेवतात. मात्र, यावेळी यात्रा महाग झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. केंद्रीय हज कमिटीनुसार कोरोनाच्या कारणामुळे जागांचा कोटासुद्धा कमी करून एक तृतीयांश करण्यात आला आहे. यावर्षी केवळ ७९ हजार २३७ भाविक हजला जातील. प्रवाशांची संख्या कमी झाल्याने विमान भाडे, निवास व्यवस्था, भोजन, एअरपोर्ट शुल्क, आरोग्य, गाइड, बससह सर्व व्यवस्थेचा खर्च दुप्पट होणार आहे. सौदी अरेबिया सरकारकडून हज यात्रेच्या टॅक्समध्ये तब्बल १५ टक्के वाढ केली. त्याचबरोबर एका खोलीमध्ये फक्त २ लोकांना राहण्याची परवानगी असेल. हजच्या व्हिसा व आरोग्य विमा शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुर्बानीसाठी स्वतंत्र १६ हजार ७४७ खर्च करावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...