आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणूक:यंदा सकाळी 11 पासूनच ढाेल ; प्रथमच सकाळपासून मिरवणूकीचा आनंद

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेश विसर्जन मिरवणुकीतील सर्व मंडळांना पांरपरिक मिरवणूक मार्गावरून जात वेळेत बाप्पांचे विसर्जन करता यावे यासाठी शहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता सुरू करण्याचा निर्णय भद्रकाली पाेलिस ठाण्यात मंगळवारी (दि. ६) पाेलिस आणि गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ११ वाजता मिरवणूक सुरू झाल्याने प्रत्येक मंडळाला प्रमुख चाैकांमध्ये थांबवण्यासाठी २० मिनिटांची वेळही यावेळी निश्चित करण्यात आला. जर या नियमाचे पालन केले नाही आणि दुसऱ्या मंडळाला अडथळा निर्माण झाला तर त्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. नाशिकमधील आतापर्यंतच्या गणेशाेत्सवातील हा निर्णय एेतिहासिक मानला जात आहे.

पाेलिसांमध्येच झाला वाद : विसर्जन मिरवणूक नियाेजनाच्या बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला हाेता. मात्र ही बैठक संपल्यानंतर दाेन वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांमध्ये झालेली तू-तू, मैं-मैं हा देखील चर्चेचा विषय ठरला. एका वरिष्ठ निरीक्षकांना थेट नियंत्रण कक्षात तुमची रवानगी करताे असा दमच त्या पाेलिस अधिकाऱ्याने दिला. त्याही अधिकाऱ्याने काेणतीही तमा न बाळगता आता लगेच जाताे असे उत्तर दिल्याने या अधिकाऱ्यांमधील हा वाद बघून उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी डाेक्यालाच हात लावला.

वाकडी बारव येथून प्रारंभ हाेणाऱ्या मिरवणुकीसाठी २०१९ प्रमाणेच गणेश मंडळांना क्रमांक देण्यात येण्यावर चर्चा सुरू हाेताच यावर काही मंडळ पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. पुढे असलेले चित्ररथ वेळ पाळत नाही, परिणामी शेवटच्या मंडळांना एमजीराेडवर यायलाच रात्रीचे १२ वाजतात. त्यामुळे मानाचे गणपती वगळून चिठ्ठी पद्धतीने नंबर काढावे अशी मागणी काही मंडळांनी केल्याने तब्बल दाेन ते अडीच तास वाद रंगला. काहीवेळ शाब्दिक बाचाबाची, हमरीतुमरीही झाली. अखेरीस काेणतेही नेते, पदाधिकाऱ्यंाची वाट न पाहता सकाळी ११ वाजता मिरवणुकीला प्रारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचे सर्व मंडळांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी गजानन शेलार, विनायक पांडे, प्रथमेश गिते, दिनेश कमाेद, गणेश माेरे, गणेश बर्वे आदींसह गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...