आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील १५ तालुक्यांच्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयांमध्ये तब्बल ७५ फूट ध्वजस्तंभ उभारला जाणार असून यामुळे कायमस्वरूपी तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे, याच ध्वजस्तंभाला लागून संविधानस्तंभही उभा केला जाणार असून यासाठी प्रत्येकी २० लाख ५० हजार याप्रमाणे एकूण ३ काेटी ७ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. या अंतर्गत १५ ऑगस्टला स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. घरोघरी राष्ट्रध्वज तिरंगा फडकवून देशभक्ती आणि राष्ट्राभीमानाची भावना देशवासीयांना अनुभवावी, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. याच कार्यक्रमार्तगत जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह १५ तालुक्यातील तहसील कार्यालयांमध्ये ७५ फूट उंच ध्वजस्तंभ उभारुन तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. ध्वजस्तंभाशेजारी संविधानस्तंभ उभारून हा तिरंगा दिवस-रात्र कायमस्वरुपी फडकणार आहे. प्रत्येक तालुक्याला ७ लाख ५० हजार संविधानस्तंभासाठी तर १३ लाख ध्वजस्थंभासाठी असा एकूण २० लाख ५० हजाराचा निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी जिल्हा नियाेजन विकास मंडळाच्या निधीतून मंजूर केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.