आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेहळा:यंदाचा अक्षय्य पुरस्कार‎ प्रशांत दामले यांना जाहीर‎

नाशिक‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट‎ नाशिक यांच्यातर्फे दरवर्षी दिला‎ जाणारा अक्षय्य पुरस्कार यंदा ज्येष्ठ‎ अभिनेते प्रशांत ‎दामले यांना‎ जाहीर करण्यात‎ आला आहे.‎मंगळवारी (दि.‎२४) बिटकाे‎ बाॅइज हायस्कूलमध्ये झालेल्या‎ पत्रकार परिषदेत संस्थेचे अध्यक्ष‎ प्रकाश वैशंपायन आणि‎ पदाधिकाऱ्यांनी या पुरस्काराची‎ माहिती दिली.‎ दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटतर्फे‎ २०१६ पासून अक्षय्य पुरस्कार‎ देण्यात येताे. यंदा हा पुरस्कार‎ प्रशांत दामले यांना त्यांच्या नाट्य‎ कारकिर्दीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष‎ प्रकाश वैशंपायन यांच्या हस्ते‎ देण्यात येणार आहे.

साेमवारी (दि.‎ ३०) महाकवी कालिदास‎ कलामंदिरात दुपारी साडेचार‎ वाजता हा साेहळा हाेणार आहे. २५‎ हजार रुपये, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह‎ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.‎ पुरस्कार प्रदान साेहळ्यानंतर सुधीर‎ गाडगीळ हे दामले यांची मुलाखत‎ घेणार आहेत. यापूर्वी डाॅ. विकास‎ आमटे, डाॅ. भारती आमटे, कविता‎ राऊत, राज्याचे माजी मुख्य सचिव‎ द. म. सुकथनकर, पद्मश्री हृदयनाथ‎ मंगेशकर, सचिन पिळगावकर यांना‎ पुरस्कार प्रदान करण्यात आला‎ आहे.‎ प्रशांत दामले यांच्या नाट्य‎ कारकिर्दीनिमित्त त्यांना हा पुरस्कार‎ संस्थेतर्फे देण्यात येईल.‎

बातम्या आणखी आहेत...