आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष:चांदवडला रस्त्याच्या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांचे ठिय्या आंदोलन

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांनी नवीन रस्त्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. याबाबत येथील रहिवाशांच्या वतीने नगरपरिषद प्रशासनास निवेदन देण्यात आले. शहरातील प्रभाग क्र. ८ मधील जनरल हाेस्टेलच्या बाजूच्या कच्च्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. हा रस्ता कागदोपत्री तयार झालेला आहे. परंतु, प्रत्यक्षात मात्र हा रस्ता तयार झालेला नाही. नगर परिषद जनतेची दिशाभूल करत असून सदर रस्ता चोरीस गेल्याचा आरोप रहिवाशांनी केला. येथे मागील वीस वर्षांपासून रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. येथील रहिवाशांना वाहतुकीसाठी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावरून वाहनांची व पायी चालणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

या रस्त्यात जागोजागी खड्डे पडलेले असून रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. रस्त्यातील दगड वर निघालेले आहेत. या दगडांवरून दुचाकी वाहने घसरून वाहन चालविणारे नागरिक खाली पडतात व किरकोळ जखमी होतात. स्थानिकांनी या रस्त्याचे काम करण्यासाठी अनेकदा नगरपरिषदेला तक्रारी अर्ज दिलेले आहेत. मात्र, अजूनही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. येथे नवीन रस्ता बांधून देण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद मुख्याधिकारी व पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी योगेश विसपुते, विनोद सोनवणे, सुरेश वाघ, अनिता दवंगे, रंजनाबाई शिंदे, शांताबाई देवरे, सुहास निकुंभे, अबुलेस शेख, पंडित धामणे, समाप्ती भोसले, मीराबाई पाटील, कल्पना भालेराव, सुरेश दवंडे, आदित्य दवंगे, अंबादास निफाडे, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...