आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण केल्याशिवाय कोणताही विचार पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचे विचार समाजहिताचे आहेत. राजकीय स्वार्थासाठी का होईना फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतले जाते, अशी टीका मंगला खिवंसरा यांनी राजकीय व्यवस्थेवर केली.माळी समाज सेवा समिती आयाेजित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सवानिमित्त विशेष पुरस्कार वितरण सोहळा, नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार, समाज दिनदर्शिकेचे प्रकाशन व मंगला खिंवसरा यांचे व्याख्यानाचे अयोजन दि.(३) मंगळवारी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.सुधीर तांबे,आमदार देवयानी फरांदे, माजी मंत्री डॉ.शोभाताई बच्छाव, माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, धन्वंतरी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष सरोजताई धुमणे ज्योतीताई माळी, उत्तमराव तांबे, बाळासाहेब जानमाळी, पी.एम सैनी, मनीष जाधव, प्रवीण गायकवाड,बाजीराव तिडके, महेंद्र शेवाळे, राका माळी, भाऊसाहेब पवार, कुसुम शिंदे, राजकुमार सूर्यवंशी, डॉ. सुभाष पवार आदी उपस्थित हाेते. मंगला खिवंसरा म्हणाल्या की, राष्ट्रपुरुषांचे फक्त नाव घेऊन चालत नाही तर त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे.
त्यांच्या विचारातून राष्ट्राची उभारणी झाली आहे. आमदार डॉ. तांबे म्हणाले की, बहुजन समजासाठी फुले दांपत्याचे विचार प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आजच्या पिढीने आचरणात आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले. सूत्रसंचालन योगेश कमोद तर आभार मयूर मोटकरी यांनी मानले. प्रभाकर क्षीरसागर, हरिश्चंद्र विधाते, प्रमोद आहेर, मंगला माळी, मंगला जाधव यांनी मेहनत घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.