आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणुक:‘जय श्रीराम’च्या जयघाेषाने दुमदुमली नाशिकनगरी, रथाेत्सवात दर्शनासाठी हजाराे भाविकांनी केली गर्दी

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिरवणूक मार्गावर काढण्यात अालेल्या रांगाेळ्या.... फुलांची हाेणारी उधळण..... सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय, जय सीता, राम सीता असा हाेणारा जयघाेष.... अन भाविकांची दर्शनासाठी झालेली गर्दी अशा उत्साहाच्या व भक्तीमय वातावरणात रविवारी दि. २ काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथून श्रीराम व गरुड रथाच्या मिरवणुकीला प्रारंभ करण्यात अाला.़

यंदाचे उत्सवाचे मानकरी असलेल्या समीरबुवा पुजारी हे श्रीराम मूर्ती, चांदीच्या पादुका हातात घेऊन काळाराम मंदिराला प्रदक्षिणा मारत मूर्ती पालखीत ठेवल्या. त्यानंतर आरती करून संध्याकाळी ६ वाजता काळाराम मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वारा बाहेर उभे असलेले दोन्ही रथ ओढून रथोत्सवाला सुरुवात झाली. दोन्ही रथाचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तीची अमृत पूजा, पंचामृत अभ्यंग स्नान, अवभृत स्नान व महापूजा करण्यात आली.

गाेदाघाट परिसराला प्राप्त झाले जत्रेचे स्वरूप दाेन वर्षांनंतर निर्बंधमुक्त रथाेत्सव हाेत असल्याने भाविकांनी दर्शनासाठी माेठ्या संख्येने गर्दी हाेती. रथाेत्सव असल्याने भाविकांची झालेली गर्दी तसेच दुकाने थाटण्यात अाल्याने गाेदाघाट परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते.