आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँगमार्च:दिंडोरीहून हजारो शेतकऱ्यांची विधानभवनाकडे कूच; 23 मार्च रोजी मुंबईत धडकणार लाँगमार्च

दिंडोरी (जि.नाशिक)14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांदा, द्राक्ष पिकांना हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी रविवारी विधान भवनाच्या दिशेने कूच केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास माकपच्या नेतृत्वाखाली दिंडोरी येथून हा लाँगमार्च सुरू झाला. २३ मार्च रोजी हा मोर्चा मंुबईत धडकणार आहे.

रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात भव्य माेर्चाला सुरुवात

नाशिक - भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) नाशिक जिल्ह्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार कॉम्रेड जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वात दिंडोरी येथून मुंबईपर्यंत महाराष्ट्राच्या विधानभवनावर पायी लाँगमार्चला रविवारी दुपारी २ वाजता सुरुवात झाली. या मार्चमध्ये दहा हजार महिला-पुरुषांनी सहभाग घेतला आहे.

दिंडोरी येथील नवीन कांदा मार्केट पासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुकाध्यक्ष अप्पा वाटणे, देविदास वाघ यांनी मोर्चाचे स्वागत केले. या वेळी रस्ता अडवत रस्त्यावर कांदे फेकत शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिक-सापुतारा महामार्गावरून मोर्चा मार्गक्रमण करत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवार दिंडोरी बाजार व रंगपंचमी असल्यामुळे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र व सप्तश्रृंगी गड येथे येणाऱ्या भाविकांना त्याचा फटका बसला. मनस्ताप सहन करावा लागला. कोरोनापूर्वी असाच नाशिक ते विधानभवन मोर्चा काढण्यात आला होतो. भव्य मोर्चा पाहून राज्य सरकारही हलले होते. यंदाच्या मोर्चाचा पहिला मुक्काम म्हसरूळ येथे होणार आहे. मोर्चासोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. या वेळी डॉ. डी. एल. कराड, माकपचे जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, सावळीराम पवार, मोहन जाधव आदींची उपस्थिती होती.

सुमारे दहा हजार शेतकरी महिला-पुरुषांनी घेतला सहभाग
यंदा मोर्चाचा मुक्काम असेल येथे
यंदा मोर्चाचा मुक्कम पाच ठिकाण होणार आहे. यात पहिला मुक्काम म्हसरूळला, वाडीवरे, घाटनदेवी कसारा, कल्याण, ठाणे आणि मुंबई विधानभवन असा मुक्काम असेल. शेतकरी वर्गाने आपल्यासोबत काही दिवसांच्या भाकरीदेखील बांधून घेतल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या जो शेतकरी जमीन कसतो त्याचे नाव सातबारावर लावण्यात यावे, अपात्र जमीन दाव्याची पूर्तता करून दावे पात्र करावेत, प्रत्येक मंजूर प्लॉटधारकाला विहीर, सोलारवरील वीज पंप, पाइपलाइन, जमिनीचे सपाटीकरण, फळबाग, लागवडसारख्या केंद्र सरकारने प्लॉटधारकांना जाहीर केलेल्या योजना राबवाव्यात, गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा, ज्या गायरान जमिनीवर घरे आहेत ती घरे नियमित करावीत, प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान १ लाख ४० हजारांवरून ५ लाख रुपये करावे, वंचित गरीब लाभार्थींचा नवीन सर्व्हे करून त्यांची नावे ड यादीत समाविष्ट करावीत, लाल कांद्याला ६०० रु. अनुदान जाहीर करून कांदा निर्यातीचे धोरण जाहीर करावे.

बातम्या आणखी आहेत...