आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाॅपर दाखवत धमकावल्याचा प्रकार:बाजार समितीमध्ये हप्ता मागत व्यापाऱ्याला धमकी ; दाेघांवर गुन्हा

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीमध्ये हमालीचे काम करणाऱ्या कामगारांची दहशत वाढत असून संशयित दाेन हमालांनी भाजीपाला व्यापाऱ्याकडे दरराेज ३०० रुपये हप्ता देण्याची मागणी करत चाॅपर दाखवत धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित हमाल पप्पू रणमाळे, सोनू काकड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम वराडे (रा, मखमलाबादरोड) यांच्या तक्रारीनुसार, भाजी मार्केट येथे भाजीपाल्याचा ते व्यापार करतात. दुकानात काम करत असताना अोळखीचे हमाली करणारे संशयित रणमाळे, काकड हे आले. येथे दुकान चालवायचे असल्यास रोज तीनशे रुपये हप्ता द्यावा लागेल अशी धमकी दिली. चाॅपर पोटास लावून पैशांचे ड्राॅवर उघडून रक्कम काढून घेतली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक डाॅ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...