आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताब्यात:तलवारीसह हत्यारे बाळगणारे तिघे ताब्यात;  गस्तीपथकालाच पाथर्डी फाटा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गस्तीपथकालाच पाथर्डी फाटा परिसरात तीन युवक संशयास्पद हालचाली करताना अढळले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन तलवारीसह धारदार शस्त्र आढळली. या तिघांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ४) रात्री इंदिरानगर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली, की तीन तरुण गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत, त्यानुसार, पथकाने संतोष कॅफे हॉटेल जवळील शाळेसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तिघांना हटकले. त्यांच्यकडे चौकशी केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले, त्यात एक पळण्याच्या तयारीत असताना त्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या संशयितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...