आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरावर छापा:नायलाॅन मांजा विक्रीप्रकरणी तिघांना अटक, 62 रिळ  जप्त

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्या तीन संशयितांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने सिंधी काॅलनी उपनगर, लोकमान्यनगर सिडको येथे कारवाई करत तीन संशयितांकडून ६२ नायलाॅन मांजाचे रिळ जप्त केले. कन्हैयालाल किशनचंद शर्मा (रा. सिंधी काॅलनी), चेतन रघुनाथ जाधव, अजय भारत कुमावत (दोघे रा. लोकमान्यनगर, सिडको) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखा युनिट २ चे पथक गस्त करत असतांना सिंधी काॅलनी येथे एका घरात नायलाॅन मांजा विक्री होत असल्याचे समजले. पथकाने बनावट ग्राहक पाठवत मांजा घेतला. घरावर छापा टाकत २० नग मांजाचे रिळ जप्त केले. दुसऱ्या पथकाने लोकमान्यनगर येथे दोघांना नायलाॅन मांजा विक्री करत असताना पकडले.

बातम्या आणखी आहेत...