आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांचे वृक्ष प्रेम:एकत्र येऊन लावली तीनशे रोटरी झाडे; नाशिक स्मार्ट सिटी तर्फे त्र्यंबकेश्वर येथे वृक्षारोपण

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

5 जून रोजी जगभरात पर्यावरण दिन साजरा झाला. तसेच पर्यावरण दिनाच्या निमित्ताने, नाशिकरांनी वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण करुन आपली परंपरा कायम राखली आहे. नाशिक स्मार्ट सिटी व रोटरी क्लब ऑफ मेटा सिटी तसेच रोटारॅक्ट क्लब स्मार्ट सिटी यांनी घेतलेल्या उपक्रमाला ही असाच उत्तम प्रतिसाद शहरवासीयांनी दिला. या संस्थांनी त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीच्या पायथ्याला जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात तीनशे वृक्षांची लागवड केली आहे.

रोज एक रोपटे लावावे असा दिला संदेश

आपल्या बरोबरच सर्व सामाजिक संस्थांना आव्हान करण्यात आले होते की त्यांनी प्रत्येकाने एक रोपटे या ठिकाणी आणून लागवड करावी. या वृक्षांचे संगोपन हे नमामी गोदा फाउंडेशन व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्या माध्यमातून पुढे चालू राहील. या संकल्पनेस भरघोस प्रतिसाद मिळाला. विविध संस्था तसेच व्यक्तिगत स्वरुपात नागरिकांनी रोपे आणून दिली. स्वतःच्या हाताने ती रोपे लावली त्यामुळे एक चांगला पायंडा या ठिकाणी पडला आहे. मोठे, लहान सर्व वयोगटातील वृक्षप्रेमी यांनी हजेरी लावली. रोटरीचे माजी प्रांत पाल दादासाहेब देशमुख, रोटरी स्मार्ट सिटी चे अध्यक्षा सौ.स्वाती चव्हाण, रोटरी क्लब मेटासिटीचे अध्यक्ष राघव पगार व रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष सौंदांकर तसेच माजी अध्यक्ष तुषार चव्हाण, अपर्णा मारावार, ललिता धामणे उपस्थित होते.

नगरपरिषद पुरविणार वृक्ष संरक्षक

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे अध्यक्ष लोहगावकर यांनी या सर्व झाडांना वृक्ष संरक्षक पुरवण्याचे मंजूर केले. त्यासाठी पाणी रोज घालण्यासाठी व्यवस्थाही नगरपालिकेतर्फे करण्यात येईल असे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...