आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:शहरात दोन अपघातात तीन ठार ; तपोवन रोडवर हा अपघात घडला

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात दोन अपघातात तीन जण ठार झाले. मॉर्निंग वॉक करणाऱ्या दोन व्यावसायिकांना कारने चिरडले. या अपघातात एक व्यावसायिक ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला. शनिवारी (दि. १४) सकाळी सहाच्या सुमारास तपोवन रोडवर हा अपघात घडला. तर आडगाव ट्रक टर्मिनल येथे दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन जण ठार झाले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काठे गल्लीत राहणारे नितीनभाई बबलदास पटेल (५३) आणि त्यांचे सहकारी बिपीनभाई पटेल हे दोघे तपोवनात सकाळी पायी जात असताना कारने दोघांना चिरडले. यात नितीनभाई पटेल यांच्या डोक्यास गंभीर मार लागून ते जागीच ठार झाले तर बिपीनभाई पटेल हे गंभीर जखमी झाले. नागरिकांनी कारचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कारमध्ये मद्याच्या बाटल्या मिळाल्या. नितीनभाई पटेल यांचे रविवार कारंजा येथे वराई ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. त्यांच्या मृत्यूने व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रकची दुचाकीला धडक, दोन ठार : आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीचालकासह पाठीमागे बसलेला एकजण ठार झाला. चंद्रशेखर पिंपरकर (रा. पिंपळगाव बसवंत) यांच्या तक्रारीनुसार, सुदाम बळवंत दिघे (७६) व दत्तात्रय रामकृष्ण पिंपरकर (७८, दोघे रा. पिंपळगाव बसवंत) हे दुचाकीने (एमएच १५ एचए ००९५) ओझरकडून नाशिककडे जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (एमएच १५ जीएच ३३३९) दुचाकीला धडक दिली. यात दोघे रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात केले असता उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. ट्रक टर्मिनल मृत्यूचा सापळा : ट्रक टर्मिनल येथे सर्वाधिक अपघात घडत असल्याने येथे पूल बांधण्यात यावा, अशी मागणी जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनने केली आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फड, उपाध्यक्ष पी. एम. सैनी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष डी. गंगाथरन यांना निवेदनाद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...