आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-मुंबई महामार्गावर ट्रक पलटी:अपघातामध्ये तिघे जखमी; घोटी रुग्णालयात उपचार सुरू

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबई महामार्गावर गोंदे येथील सॅमसोनाईट कंपनी जवळ लोखंडी साहित्य घेऊन जाणारा ट्रकचा सोमवारी (05 सप्टेंबर) पहाटे 5.30 वाजेच्या सुमारास अपघात झाला. महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक तीन तास खोळंबली होती.

तीन तास वाहतूक ठप्प

मिळालेल्या माहितीनुसार, माहामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती पोलिसांना मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात चालकासह तिघे जखमी झाले आहेत, अपघात ग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला घेण्यासाठी वाहतूक मार्ग पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तब्बल तीन तास उलटूनही वाहतूकीच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही वेळाने पोलिसांनी विरुद्ध दिशेने येणाऱ्या मार्गावरच दुहेरी वाहतूक सुरू करून काही प्रमाणात वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न केला.

कसा झाला अपघात ?

नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना क्रमांक एम. एच. 46 एफ 6205 हा ट्रक महामार्गावरील खड्ड्यात जाऊन आदळला. यात ट्रकची स्टेरिंग रॉड तुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात ओम प्रकाश सिंग (वय 28) रफिक रहीम खान (वय 45) दिलीप कुमार सिंग (वय 39) राहणार उत्तर प्रदेश हे गंभीर जखमी झाले आहे. दरम्यान जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस केंद्र घोटी, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे मोफत रुग्णवाहिका तात्काळ घटना स्थळी दाखल होत पुढील उपचारासाठी घोटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

महामार्गाची यंदाच्या पावसाळ्यात नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणावर दूरवस्था झाली असून, हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रत्येक किलोमीटर अंतरावर छोटे-मोठे खड्डे नजरेस पडत आहेत. खास करुन वाडीव-हे, घोटी, इगतपुरी, कसारा तसेच शहापूरजवळ तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते आहेत? असाच प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला पडत आहे. याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे रोज छोटे-मोठे अपघातही खड्ड्यांमुळे होत आहेत. रात्रीच्या वेळी तर या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. मोठी दुर्घटना किंवा अपघात होण्याआधी संबंधित विभागाने महामार्गावरील हे खड्डे तातडीने बुजवन्याची मागणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...