आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेनरोडवरील फावडे लेनमधील मध्ये राजेंद्र आंबेकर यांच्या ३ मजली वाड्याला बुधवारी (दि.२८) रात्री भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या सहा बंंबांद्वारे आग विझविण्यात आली. आगीची घटना घडली तेव्हा आंबेकर हे त्यांचा मुलगा अनिरुद्धसोबत या वाड्यात झोपलेले होते. पिता-पुत्रांना वेळीच जाग आल्याने त्यांनी वाड्यातून बाहेर पळाले.
तसेच आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण वाडा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. फावडे लेनच्या तोंडाशी अग्निशमन दलाचे बंब उभे करून पाण्याचे पाइप पेटलेल्या वाड्यापर्यंत घेऊन जात जवानांनी आग नियंत्रणात आणली. पाण्याचा मारा केला. शॉर्टसर्किटने आगीची घटना घडल्याचे प्रथमदर्शनी अंदाज वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात आली. मात्र,आगीत वाहनतळात उभ्या असलेल्या तीन दुचाकी यांचा समावेश आहे. वाड्यामध्ये पाच गॅस सिलिंडरही होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.