आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:अवैध गुटखा विक्री‎ करणारे तीन‎ संशयित ताब्यात‎

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ अवैध गुटखा विक्री करणाऱ्या‎ तीन संशयितांना ताब्यात घेण्यात‎ अाले. अंबड पोलिस ठाण्याच्या‎ गुन्हे शोध पथकाने संजीव नगर‎ येथे अाझाद पान शाॅप येथे ही‎ कारवाई केली. संशयितांच्या‎ विरोधात अंमली पदार्थविरोधी‎ कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल‎ करण्यात अाला अाहे.‎ पोलिसांनी दिलेली अाणि‎ पोलिस शिपाई प्रवीण राठोड यांनी‎ दिलेल्या तक्रारीनुसार, संजीवनगर‎ येथे अझाद पान शाॅपमध्ये अवैध‎ गुटखा विक्री होत असल्याची‎ माहिती मिळाली.‎

पथकाने शाॅपवर छापा टाकला‎ असता शाॅपमधून विविध‎ कंपनीचा गुटखा जप्त केली.‎ संशयित अतहर वाहिद अली‎ हुसैन, अब्दुल रही अब्दुल कय्युम‎ चौधरी, मोहम्मद जाबीर मुस्ताक‎ खान सर्व रा. संजीव नगर अंबड‎ लिंक रोड यांना ताब्यात घेण्यात‎ अाले. उपनिरीक्षक संदीप पवार‎ यांच्या पथकाने वरिष्ठ निरीक्षक‎ नंदन बगाडे यांच्या‎ मार्गदर्शनाखाली ही कारवाई‎ केली.‎

बातम्या आणखी आहेत...