आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये उड्डाणपूलावरून कोसळले कंटेनर अन् पाेकलंड:सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही; मुंबई आग्रा महामार्गावरील घटना

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई आग्रा महामार्गावरील विल्हाेळी उड्डाणपूलावरून शुक्रवारी (दि. ३) दुपारी कंटेनरसह पाेकलंड, ट्रक अशा एका पाठाेपाठ एक तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. ही वाहने थेट पुलाचा कठडा ताेडून खाली कोसळल्याने एकच आवाज झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

नाशिक मुंबई महामार्गावर विल्होळी येथील उड्डाणपुलावर शुक्रवारी दुपारी १२ वाजता मुंबईकडे जाणारा कंटेनर (एमएच ०६ एक्यू ६१२५) त्या कंटेनरवर असलेले पॉकलँड मशीन रस्त्यावरून जात असताना, कंटेनरची स्टेरिंग लॉक झाल्यामुळे अपघात होऊन वाहने उड्डाणपूलाच्या खाली सर्व्हिस रोडवर उभे असलेल्या टाटा आयशर क्रमांक (एमएच १५ एचएच ०५८१) या वाहनावर कोसळली. या अपघातात तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ग्रामस्थ संजय चव्हाण यांच्यासह ग्रमास्थांनी तत्काळ तालुका पोलिस स्टेशनला माहिती कळविताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक सारिका आहीरराव यांनी घटनास्थळी दाखल झाल्या. तातडीने अपघात ग्रस्त रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी इतर यंत्रणांना सूचना दिल्या. तासभरानंतर वाहतुकीस रस्ता मोकळा केला.

मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिकच्या हुल्लोळी नजीक उड्डाणपुलावर झालेल्या अपघातामुळे एकच आवाज होऊन परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी गावात त्यांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्याच्या माहिती दिल्याने पोलिसांनी धाव या विचित्र अपघातात एक कंटेनर पोकलँड वाहनांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्या तरी सुदैवाने तीनही वाहनांचे चालक प्रसंगावधान राखल्याने ते बालम बाल बचावले.

अपघात आणि महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती विशेष म्हणजे पोलिस यंत्रणेने तातडीने मदत कार्य हाती घेतल्याने व तिने वाहन महामार्गावरून बाजूला केल्याने त्यास दीड तासांमध्ये वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले उड्डाण पुलावरून वाहने कोसळल्याने मोठी दुर्घटना झाल्याचे चर्चेमुळे घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती पोलिसांनी वेळीच नाव घेतल्याने मदत कार्य हाती घेतले या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...