आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिअो दाखवत तिचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्यात आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. शुक्रवारी (दि. ४) विशेष न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली. अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सिन्नर तालक्यात ३ ऑगस्ट २०१५ रोजी दुपारी २ वाजता ९ वर्षीय मुलगी घरी एकटी असताना आरोपी गणेश सदाशिव जाधव (२४) हा घरात घुसला. मुलीला मोबाइलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत तिच्यासोबत अश्लील वर्तन करत विनयभंग केला. सिन्नर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल केला. तत्कालीन उपनिरिक्षक तृप्ती आठवले पुरावे गोळा केले. न्यायालयाने पंच, साक्षीदार, फिर्यादी यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या पुराव्यास अनुसरून शिक्षा दिली. अॅड. दीपशिखा भिडे यांनी ६ साक्षीदार तपासले.

बातम्या आणखी आहेत...