आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:रधाव कारचा थरार,‎ महिलेसह चार-पाच‎ वाहनांना धडक‎

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या‎ कारने पादचारी महिलेसह‎ रस्त्यावरील चार ते पाच कार‎ अाणि दोन तीन दुचाकींना धडक‎ दिली. शुक्रवारी (दि. ६)‎ सायंकाळी ४ वाजता हा अपघात‎ घडला. कार अल्पवयीन मुलगा‎ चालवत असल्याचे नागरिकांनी‎ सांगितले. अपघातानंतर कार‎ सोडून चालक फरार झाला अाहे.‎ याबाबत पोलिसांनी दिलेली‎ माहिती अशी, चोपडा लाॅन्स ते‎ मखमलाबादरोडवर काळ्या‎ रंगाच्या कारने भरधाव येऊन‎ पिकअपला धडक दिली. याच‎ स्थितीत चालकाने कार वेगात‎ चालवत पुढे जाणाऱ्या चार ते‎ पाच कारला धडक दिली.‎ नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या‎ कडेला चालणाऱ्या पादचारी‎ महिलेला कारने धडक दिल्याने‎ महिला गंभीर जखमी झाली.‎ काही चालकांनी कारचा पाठलाग‎ केला, मात्र संशयित चालक‎ वेगात कार चालवत असल्याने‎ त्याला पकडणे शक्य झाले नाही.‎ थोड्या अंतरावर कार सोडून‎ चालक फरार झाला. सरकारवाडा‎ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत‎ गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू‎ होते.‎

बातम्या आणखी आहेत...