आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दशकपूर्ती:अर्पण थॅलेसेमिया सोसायटीचा दशकपूर्ती सोहळा उत्साहात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र व भारत’ ही संकल्पना साकार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीचा दशकपूर्ती सोहळा नुकताच पार पडला. त्यात मयूर डान्स अकॅडमीमार्फत हा विकार व उपचार यावर जागृती करणारी नाटिका सादर करण्यात आली व थॅलेसेमियाग्रस्त मुलांनी विविध उपक्रम सादर केले. शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात सुनीता बोहरा प्रमुख अतिथी होत्या. यावेळी आवर्जून उपस्थित असलेले प्रख्यात अभिनेते चिन्मय उद्‌गीरकर यांनीदेखील सोसायटीच्या कार्यप्रसारात सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला. उपचारार्थी व नातेवाइकांना डॉ. नीलेश वासेकर, डॉ. सिद्धेश कलंत्री आणि डॉ. वैशाली काळे यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यात सोसायटी आणि अर्पण रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर संयोजक, दानशूर संस्था तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अध्यक्ष डॉ. एन. के. तातेड, उपाध्यक्ष डॉ. अतुल जैन, कार्यकारी संचालक डॉ. वर्षा उगावकर, डॉ. रत्नाकर कासोदकर, डॉ. वैशाली काळे, डॉ. रचना पवार उपस्थित होते. दर्शना वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंचल लुथरा यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...