आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेक:वृत्तपत्रविक्रेत्याच्या घरावर दगडफेक; नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

नाशिकरोड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील भांडणाची कुरापत काढून रात्रीच्या वेळी वृत्तपत्रविक्रेत्याच्या घर व वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार येथे शुक्रवारी घडला. देवळालीगावातील पाटील गॅरेजमागील भागात ही घटना घडली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाशिकरोड पोलिसांनी दिलेली माहिती आणि उषा अनिल कुलथे यांच्या तक्रारीनुसार, देवळालीगाव येथील पाटील गॅरेजमागे स्थानिक नागरिकांसोबत वाद झाला होता.

संशयितांनी ही गाेष्ट मनात ठेवून कुलथे यांच्या घरावर दगडफेक केली. चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या, दुचाकीवर माेठे दगड टाकून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पुरुषांसह महिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी नाशिकराेड पाेलिसांनी याेगेश रमेश आव्हाड, प्रिन्स लांबा, किरण शिवाजी शिंदे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सध्या अवैध धंद्यासह गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याची पोलिस दखल घेत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. नाशिकरोड व उपनगर हद्दीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पुढाकार घ्यावा, अशीही मागणी संघटनेच्या वतीने वृत्तपत्रविक्रेता बांधवांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...