आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून:डोक्यात मारला टिकाव, पिता पूत्र अटकेत; शेतीच्या वादातून घडला प्रकार

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडिलोपार्जित शेती करण्याच्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाच्या डोक्यात टिकाव मारुन खुन केल्याचा धक्कादायक प्रकार जलालपुर शिवारात गुरुवारी (ता. 16) सकाळी घडला. जबरदस्त घाव बसल्याने जखमीवर उपचार सुरु असताना रात्री 9 वाजता त्याचा मृत्यू झाला. तालुका पोलिस ठाण्यात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा पिता पुत्राला अटक करण्यात आली.

संशयीत श्रीहरी कोंडाजी शेळके, जयदीप श्रीहरी शेळके असे अटक केलेल्या पिता पुत्राचे नावे आहेत. तर बळवंत कोंडाजी शेळके (वय 57) असे खुन झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि अक्षय शेळके (रा. यशंवतनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जलालपुर येथे वडिलोपार्जित शेती आहे. मोठा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके (वय 60) हे अनेक वर्षापासून शेती करतात. मृत बळवंत शेळके आणि त्यांचे भाऊ कुटूंबियासह शेतावर गेले होते.

मोठा भाऊ संशयित श्रीहरी याने दोघा भावांना शेती करण्यास मज्जाव केला. तिन्ही भावांमध्ये वाद सुरु झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संशयित श्रीहरी आणि त्याचा मुलगा जयदीप तसेच पत्नी सुमन यांनी बळवंत शेळके यांच्यावर हल्ला केला. एकाने बळवंत यांच्या डोक्यात टिकाव मारल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना त्यांचा मुलहा अक्षय आणि भावाने शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. बळवंत शेळके हे इरिगेशन विभागात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांची आज रात्रपाळी होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना असा परिवार आहे. वरिष्ठ निरिक्षक सारिका आहिरराव तपास करत आहे. पोलिसांना दोघा पिता पुत्रांना अटक केली आहे. सुमन शेळके यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...