आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिका सेवेत काम करणारे नाशिक जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे चारशेहून अधिक सुरक्षारक्षकांचे १३ महिन्यांचे वेतन रखडल्याचे चित्र आहे. एप्रिल २०२१ पासून त्यांना वेतन मिळालेच नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, वेतन मिळाले नाही, तर महापालिकेसमोर आत्महत्या करण्याचा इशारा या सुरक्षारक्षकांकडून देण्यात आला आहे.
महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत आहे. नोव्हेंबर २०२० त्यांची सेवा खंडित करण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात होता. याबाबत त्यांच्या संघटनेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयात सुनावणी होऊन पुढील निर्णय येत नाही. तोपर्यंत या सुरक्षारक्षकांची सेवा खंडित करण्यात येऊ नये, त्यांचे वेतन अदा करण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीदेखील एप्रिल २०२१ पासून आत्तापर्यंत सुमारे १३ महिन्याचे वेतन त्यांना देण्यात आलेले नाही.
कोरोना प्रादुर्भाव काळातदेखील या सुरक्षारक्षकांकडून स्वतःची, तसेच कुटुंबाची चिंता न करता इमानेइतबारे सेवा बजावली. त्याची जाणीवही ठेवण्यात आलेली नाही. वेतन न मिळाल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण अशा विविध समस्या जाणवत आहे. महापालिकेस याबाबतची वेळोवेळी जाणीव देण्यात आलेली आहे. असे असताना त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. शेवटी असह्य होऊन खचलेले सुरक्षारक्षक योगेश विवेकानंद स्वामी यांनी येत्या काही दिवसांत वेतन देण्यात आले नाही, तर बुधवारी (दि. २२) महापालिका मुख्यालयासमोर सकाळी आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. या बाबतची परवानगी मिळावी. यासाठी त्यांच्याकडून सरकारवाडा पोलिस ठाण्यात पत्र देण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.