आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक महिला‎ दिन:‘यशस्विनी’च्या कार्यशाळेत‎ सौंदर्य खुलवण्यासाठी टिप्स‎

नाशिक‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवण्यासाठी‎ तसेच केस गळणे कमी करण्यासाठी‎ आहारात प्रथिने व व्हिटॅमिन्सचे प्रमाण‎ वाढवा, असे प्रतिपादन त्वचाविकार व‎ सौंदर्यशास्त्रतज्ज्ञ डॉ. श्रद्धा सोननीस‎ यांनी केले. जागतिक महिला‎ दिनानिमित्त पारिजातनगर यशस्विनी‎ महिला मंडळातर्फे आयोजित‎ व्याख्यानात त्या बोलत होत्या.‎ व्यासपीठावर यशस्वीनी महिला‎ मंडळाच्या अध्यक्षा स्वाती ब्राह्मणकर,‎ डॉ. उमा मोदगी, गुलबक्षी ओतूरकर,‎ रूपाली कोठावदे उपस्थित होत्या.‎ महिलांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे‎ साेननीस यांनी सोप्या शब्दांत निरसन‎ केले. यावेळी उपस्थित महिलांची‎ मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.‎ रूपाली बागड, अबोली भामरे, वंदना‎ मोराणकर, प्रवीणा मोराणकर यांनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...