आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:पर्यवेक्षक व ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून; महापालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्याची आत्महत्या

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी गाव परिसरात राहणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. यासंदर्भात घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालकांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. किरण माणिक पुराणे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. किरण हे पूर्व विभागात कार्यरत होते. घंटागाडी पर्यवेक्षक व ठेकेदाराच्या त्रासाला कंटाळून किरण यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. पुराणे यांनी आत्महत्या करण्याआधी एक संदेश सोशल मीडियात पाठवलेला होता. या संदेशात सुपरवायझर आणि ठेकेदाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

मयत किरण हे नाशिक महापालिकेच्या पूर्व विभागात कार्यरत होते. सोशल मीडियात किरण यांच्या नावाचा एक संदेश पोस्ट झालेला आहे. याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड हे चौकशी करीत असून त्यानंतर किरण यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...