आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाइक रॅली:भारतीय जनता युवा मर्चातर्फे  आज तीर्थ विकास बाइक रॅली ; सिन्नर फाटा येथील उड्डाणपुलावरून या रॅलीस प्रारंभ

नाशिक22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारला ८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व साजरे केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रविवारी (दि. १२) तीर्थ विकास बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता सिन्नर फाटा येथील उड्डाणपुलावरून या रॅलीस प्रारंभ होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा गांधी पुतळा, बिटको पॉइंट, नांदूरनाका, बस डेपो तपोवन, के. के. वाघ कॉलेज उड्डाणपूल, बडी दर्गा, जुने नाशिक, अभिनव भारत मंदिर (तिळभांडेश्वर लेन), यशवंत व्यायामशाळा, सीबीएस, आकाशवाणी टॉवर, सातपूर बस स्टॅण्डमार्गे आयटीआय पूल, हेडगेवार अभ्यासिका त्रिमूर्ती चौक, खुटवडनगर, टेंभीनाका, महालक्ष्मीनगर, बुद्धविहार, अंबड गाव, महाजननगर, तीर्थ धाम, पाथर्डी फाटा, अश्विननगर, सेंट्रल पार्क या मार्गे रॅली निघून अंबड पोलिस स्टेशन येथे रॅलीचा सपारोप होईल. रॅलीमध्ये भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, ॲड. राहुल ढिकले, सीमा हिरे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर आदी सहभगी हाेतील. रॅलीत सहभागाचे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...