आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या तारांगण प्रकल्पाला लागणाऱ्या ६४ बॅटऱ्यांसाठी केवळ दीड लाखाचा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याचे चित्र असून कोट्यवधीचा हा प्रकल्प दोन वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक येत असून त्यांना कर्मचाऱ्यांकडून परत पाठवले जात असल्याचे चित्र आहे.
देशभरात नाशिक महापालिका ही तारांगण सुरू करणारी पहिली
महापालिका ठरली. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील संशोधक, खगोलप्रेमी, जिज्ञासू व शालेय विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचा फायदा व्हावा यासाठी हा प्रकल्प उभारण्यात आला. मुंबईच्या वरळी येथील नेहरू तारांगणाच्या धर्तीवर त्र्यंबकरोडवर चटकन लक्ष जाईल अशा मोक्याच्या ठिकाणी ‘तारांगण’ची दिमाखदार वास्तू उभी करण्यात आली. सहा हजार चौरस मीटरवर महापालिकेने हा प्रकल्प सुरू केला. २००७ मध्ये राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते तारांगणचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी अपेक्षित उत्पन्न देणाऱ्या या प्रकल्पाकडे कालांतराने खुद्द महापालिकेचे व परिणामी भेट देणाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने प्रकल्प चालविण्यासाठी येणारा खर्च व उत्पन्न यातील तफावत वाढत गेली. त्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर आहे.
दोन वर्षांपासून प्रकल्प बंदच
कोरोना काळाच्या आधीच तारांगण प्रकल्प महापालिकेकडून बंद करण्यात आला होता. त्यात काेराेनाचे कारण देऊन दोन वर्षे तारांगण बंद ठेवण्यात आले. मागील अडीच वर्षांपासून तारांगण बंद असल्याने सर्व बॅटऱ्या खराब झाल्या असून या बॅटरी खरेदीसाठी महापालिकेडून दीड लाखाचा खर्च केला जात नसल्याचे चित्र आहे. संपूर्ण उन्हाळा संपला. या दिवसात बच्चे कंपनीस सुटी असते. मात्र त्यांची निराशा झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.