आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ तुमच्या दारी:टेक्सासच्या मराठी घरांमध्ये होणार साहित्य मंथन; सोशल मीडियाचा आनंददायी उपयोग

नाशिक15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ सोशल मीडियाद्वारे संपर्क आला, मराठी साहित्य वाचन चळवळ समजली आणि त्यातूनच मग ह्यूस्टन-टेक्सास येथील मराठी कुटुंबियांच्या घरात ग्रंथ पेट्यांद्वारे ते साहित्य रवाना होते... ही गोष्ट आहे मूळचे भारतीय, पण सध्या टेक्सास येथे असलेले अमोल भोमे आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारीचे प्रणेते विनायक रानडे यांची.

ह्यूस्टन - टेक्सास येथे वास्तव्यास असलेले, पण मूळचे भारतीय असलेले वाचनप्रेमी अमोल भोमे यांनी ग्रंथ तुमच्या दारी योजनेचे प्रवर्तक रानडे यांच्याशी व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला आणि ग्रंथ तुमच्या दारी योजना समजून घेतली, त्यांना ग्रंथ तुमच्या दारी योजना खूपच भावली , त्यांनी त्यातील सर्व बारकावे आणि वाचनानंदासाठी किती उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध केली जातात हे समजून घेतले. ह्यूस्टन - टेक्सास येथील मराठी साहित्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या वाचकांना पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून त्यांनी पुढाकार घेतला आणि बघता बघता ह्यूस्टन - टेक्सास येथील 10 वाचक कुटूंबानी सक्रिय सहभाग नोंदवला त्यामुळे अमोल भोमे , समन्वयक ह्युस्टन - टेक्सास यांच्या पुढाकाराने 14 ग्रंथ पेट्या ह्यूस्टन - टेक्सास येथे रवाना होत आहेत.

तिथे योजना जावी

उपक्रमाबद्दल रानडे म्हणाले की, जगभरात आज मराठी माणूस नाही अशी भूमी नाही, म्हणजेच ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत. जिथे म्हणून मराठी शब्द, मराठी भाषा आहे, मराठी माणूस आहे तिथे तिथे आमची योजना जावी अशी आमची इछा आहे.

अशी आहे ग्रंथपेटी एका ग्रंथ पेटीत 25 पुस्तक आहेत. प्रत्येक पेटीतील पुस्तक वेगळी असतात. विविध भागात या पेट्या वाचक कुटुंबाला तीन महिन्यासाठी उपलब्ध होतात. दर 3 महिन्यांनी पेट्या परस्परांच्यामध्ये बदलत्या ठेवल्यामुळे सर्वाना मोठ्या प्रमाणात दर्जेदार मराठी ग्रंथसंपदा वाचनासाठी उपलब्ध होत राहाते. भविष्यात जश्या ग्रंथ पेट्या वाढत जातात तेवढी विविध प्रकारची जास्तीत जास्त पुस्तक आपल्या वाचकांना उपलब्ध होतात.

ग्रंथ तुमच्या दारीचा विस्तार भारतात - महाराष्ट्र , गोवा , गुजराथ , दिल्ली , सिल्व्हास, तामिळनाडू , कर्नाटक. भारताबाहेर - दुबई , नेदरलँड , टोकियो , अटलांटा , स्वित्झरलॅन्ड , ऑस्ट्रेलिया , फिनलँड , वॉशिंग्टन DC , मॉरिशस , ओमान , मस्कत , सॅनफ्रान्सिस्को , बे एरिया , लंडन , श्रीलंका , ब्रिस्बेन , टोरंटो , ह्यूस्टन .

बातम्या आणखी आहेत...