आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासादायक:दुहेरी फायर सेसमधून उद्याेजकांची सुटका करणार; ‌झूम दर महिन्याला

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अग्निशमन केंद्रासाठी वसूल हाेत असलेल्या जाचक दुहेरी फायर सेसमधून उद्याेजकांची लवकरच सुटका हाेऊन एकच कर त्यांना द्यावा लागेल. त्याचबराेबर सध्या आकारली जात असलेली ११ पट घरपट्टी देखील आैद्याेगिक दरानेच वसूल केली जावी असे आदेश उद्याेगमंत्री उदय सामंत यांनी दिले. उद्याेजकांचे प्रश्न वेळच्या वेळी साेडविण्यासाठी झूमची बैठक दर महिन्याला घेण्यात यावी, असे आदेश देतानाच राज्यभरात यापुढे दरमहा अशा बैठका घेतल्या जातील याकडे सामंत यांनी लक्ष वेधले.

आयमा रिक्रिएशन सेंटर येथे रविवारी उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्याेजक संघटनांच्या बैठकीत भुसे बाेलत हाेते. व्यासपीठावर खासदार हेमंत गाेडसे, आमदार सीमा हिरे, मनपा आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार यांसह आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, सरचिटणीस ललित बुब, बीआेटी चेअरमन ज्ञानेश्वर गाेपाळे, माजी चेअरमन धनंजय बेळे यांसह पदाधिकारी हाेते.

शहरातील वाहतुकीचा विषय गांभीर्याने घेऊन शहराच्या बाहेर चारही बाजूने असलेल्या जुन्या जकात नाक्यांच्या बाजूला तसेच एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनस असावे याकरिताच्या सूचना देत, पंधरा दिवसांत हा विषय संपला पाहिजे असे आदेशच सामंत यांनी महापालिका आयुक्त तसेच एमआयडीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले.

बंद उद्याेगांबाबत धाेरणात्मक निर्णय घ्या -खासदार गाेडसे
आैद्याेगिक वसाहतीत जे माेठे उद्याेग बंद पडलेले आहेत, त्यांच्याकडे माेठ्या प्रमाणावर जागा अडकून आहे. अशा उद्याेगांबाबत तातडीने सरकारने धाेरणात्मक निर्णय घ्यावा. जेणेकरून ह्या जागांवर दुसरे उद्याेग उभे राहू शकतील, तरुणांना राेजगार उपलब्ध हाेऊ शकेल, अशी जाेरदार मागणी खासदार हेमंत गाेडसे यांनी यावेळी केली.

स्वतंत्र पााेलिस ठाणे १५ दिवसांतच : पालकमंत्र
आैद्याेगिक वसाहतीकरिता स्वतंत्र पाेलिस ठाण्याची उद्याेजकांची मागणी आल्यानंतर तातडीने त्यावर कार्यवाही केली असून लवकरच हे स्वतंत्र पाेलिस ठाणे सुरू करणार आहे. मनुष्यबळाची पाेलिस खात्यातही कमतरता असली तरी विविध ठिकाणाहून ती संख्या पूर्ण केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...