आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा रद्द:आरोग्य विभागात भरतीसाठी आज आणि उद्या होणारी परिक्षा रद्द

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागाच्या वतीने गट ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी शनिवारी(दि.२५) आणि रविवारी(दि.२६) होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परिक्षेसंदर्भात उमेदवारांना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रारी करण्य‍ात आल्या होत्या. परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही, शेवटच्या दिवसापर्यंत अनेकांचे प्रवेशपत्र मिळाले नाही, प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ यांचा उल्लेखच नाही, दोन पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य तसेच, वारंवार अनेकदा हँग होणारे संकेतस्थळ अशा प्रचंड गोंधळाच्या तक्रारी होत्या. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.‘न्यासा’ नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.

आरोग्य विभागाच्या गट ‘क’ वर्गात रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक तसेच गट ‘ड’ वर्गात शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष,स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस अशा पदांवर भरतीसाठी ही परीक्षा हाेणार हाेती. आता नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आराेग्य विभागाने कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...