आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत:पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मुक्त विद्यालयाद्वारे प्रवेशास आजचीच मुदत

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाच्या धर्तीवर राज्याचे मुक्त विद्यालय मंडळ सुरू करण्यात आले असून मुक्तपणे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना साेमवारपर्यंत (दि.७) अर्ज करता येईल. याअंतर्गत पाचवी आणि आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल. या मंडळाअंतर्गत १० वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी पाचवी, तेरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी आठवी आणि पंधरा वर्षे पूर्ण झालेले विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ शकतील.

१४ वर्षांखालील मुलांची मुक्त विद्यालय केंद्राचे नियमित विद्यार्थी म्हणून नोंद करण्यात येते. या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी https://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी १७ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. तर विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, शुल्क, मूळ कागदपत्र नमूद केलेल्या केंद्रात जमा करण्यासाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत असेल.

बातम्या आणखी आहेत...