आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश:अकरावीच्या प्रवेशासाठी आज अखेरची मुदत; 40116 पैकी 3 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावीच्या प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष फेरीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी गुरुवारी (दि. ८) ही अखेरची मुदत आहे. विशेष फेरीसाठी जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीद्वारे ४ हजार ११६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या फेरीत सर्वाधिक ३ हजार ३१२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे काॅलेज मिळाले असल्याने या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य असेल. आतापर्यंत ३०७५ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.

अकरावीसाठी सर्वाधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतरही पहिल्या तिन्ही नियमित फेऱ्यांमध्ये झालेल्या प्रवेशांची संख्या कमी राहिली. शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत कला, वाणिज्य, विज्ञान आणि संयुक्त शाखा यांच्या मिळून २६ हजार ४८० जागा असून नियमित फेऱ्यांमध्ये १३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. प्रतीक्षेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने विशेष फेरी राबविली जात आहे. पहिल्या विशेष फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ८ सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. दि. ९ राेजी रिक्त जागांचा तपशील जाहीर हाेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...