आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमित शुल्कासह:17 नंबर अर्जासाठी नियमित शुल्कासह आज शेवटची मुदत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेचा १७ नंबर अर्ज भरण्यासाठी नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना बुधवारी (दि. २४) अखेरची मुदत आहे. मुदतीत अर्ज करू न शकलेल्यांसाठी मंडळाने वाढीव मुदत दिली आहे. पण, त्यासाठी विलंब आणि अतिविलंब शुल्क आकारले जाणार आहे. त्यानुसार विलंब शुल्कासह ३० सप्टेंबरपर्यंत तर अतिविलंब शुल्कासह ३१ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे

दहावीसाठी http://form17. mh-ssc.ac.inतर बारावीसाठी http://form17. mh-hsc.ac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरता शाळा सोडल्याचा दाखला, नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र, आधारकार्ड, स्वत:चा फोटो, ऑनलाइन अर्ज भरताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आहेत. m

बातम्या आणखी आहेत...