आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक प्लम्बिंग दिवस येत्या ११ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने इंडियन प्लम्बिंग असोसिएशनने आजपासून (दि. ४) विविध कार्यक्रमांचे आयाेजन केले आहे. सकाळी ७ वाजता कॉलेजराेड येथे सपट महाविद्यालयापासून वाॅटर वाॅकेथाॅन रॅली सुरू हाेईल. यात पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात येईल. जलजागृती, जलसंवर्धन तसेच सुयोग्य प्लम्बिंग याबाबतीत देशव्यापी जनजागृती करण्यासाठी ४ ते ११ मार्चदरम्यान जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती नाशिक शाखेचे अध्यक्ष मिलिंद शेटे यांनी दिली.
आरोग्य तपासणी आणि वॉटर वॉकेथॉन यातील नावीन्यपूर्ण उपक्रम आहे. शहरातील विविध विद्यार्थी तसेच प्लम्बिंग व्यावसायिक एकत्र येऊन “पाणी बचाव जागृती रॅली” काढणार आहे. ४ नाशिक रनर्सचे संस्थापक एन. टी. वाघ, संजय अमृतकर व धावपटू मनीषा राैंदळ यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात होईल. ‘पाणी बचतीचे महत्त्व’ या विषयावर आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, पाणी बचत व नियोजन यावर आंतर निबंध स्पर्धा हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.