आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:वाढत्या गुन्हेगारीविरोधात नाशिकरोडला राष्ट्रवादीचे आज निषेध आंदाेलन

नाशिकरोड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने वर्षाकाठी फक्त १५ गॅस सिलिंंडर देण्याचा घेतलेला निर्णय, नाशिकरोड परिसरात वाढलेली गुन्हेगारी, रस्त्यावर पडलेले खड्डे, भुयारी गटारींची नादुरुस्ती, जलवाहिनीमधून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नाशिकरोड येथे रविवारी (दि. २) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या पुतळ्याजवळ केंद्र व राज्य शासनासह महापालिका प्रशासनाचा निषेध करणार आहे. एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत जेलरोड येथील राधाकृष्ण मंदिरात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

या बैठकीत विभागाध्यक्ष मनोहर कोरडे यांनी नाशिकराेडसह परिसरातील समस्यांवर मार्गदर्शन केले. या समस्यांच्या विरोधात देवळालीगाव येथील महात्मा गांधी यांच्या जंयतीनिमित्ताने रविवारी सकाळी ९ वाजता निषेध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी विक्रम कोठुळे, योगेश निसाळ, शांताराम भागवत, रितेश केदारे, मिलिंद पगारे, शंकरभाई मंडलिक, जगदीश पवार, रूपाली तायडे, सुरेखा निमसे, रूपाली तुपे यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...