आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदीत तेजी:आजच्या गुंतवणुकीने भविष्यात हाेईल ‘चांदी’ ; साेनेही 56 हजार रुपयांवर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात काेराेना काळाप्रमाणेच अनिश्चित परिस्थितीमुळे साेन्या-चांदीचे दर गगनाला भिडत आहेत. त्यातच चांदीने प्रतिकिलाेसाठी तब्बल ७१ हजार रुपये गाठल्याने आताच जर चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास भविष्यात त्याचा फायदाच हाेऊ शकताे, असे सराफी तज्ज्ञांसह व्यावसायिक सांगत आहेत. एवढेच नव्हे तर साेनेही प्रतिताेळा ५६ हजारांवर पाेहाेचले आहे.

जगात काेराेना काळात वारंवार साेन्या-चांदीचे दर विक्रम स्थापित करत ५६५०० रुपये प्रति दहा ग्रॅमकरिता जाऊन पाेहाेचले हाेते तर चांदीचे दरही ७० हजारांवर गेले हाेते. यानंतर तब्बल दाेन वर्षांनंतर आता साेन्या-चांदीला पुन्हा झळाळी आली असून साेमवारी (दि. १९) चांदीने प्रतिकिलाेसाठी ७१५०० रुपये गाठले तर साेने प्रतिताेळ्यासाठी पुन्हा एकदा ५६ हजारांच्या जवळ म्हणजे, जीसएटीसह ५५८०० रुपयांपर्यंत गेले.

एकीकडे रशिया-युक्रेनचे युद्ध, त्यामुळेच तिसऱ्या महायुद्धाची व्यक्त हाेणारी भीती, चीन-तैवानमधील तणाव, चीनमध्येच पुन्हा झालेला काेराेनाचा विस्फाेट याचा परिणाम सराफी बाजारावर हाेत आहे. मात्र अशा कठीण काळात साेने विशेषत: चांदीची गुंतवणूक महत्त्वाची ठरते. देशही भविष्यातील सुरक्षेचा उपाय म्हणून साेने खरेदी करत आहेत.

साेन्या-चांदीत मार्च अखेरपर्यंत माेठी भाववाढ आंतरराष्ट्रीय घडामाेडींमुळे साेन्या-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. मार्चअखेरपर्यंत साेन्यात माेठी भाववाढ बघायला मिळू शकते. दीर्घकाळासाठी चांदीमध्ये गुंतवणुकीसाठी हा वाढलेला दरदेखील भविष्याचा विचार करता अत्यंत याेग्यच आहे. भविष्याची चांदी करणारा असाच हा दर आहे. - चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष, नाशिक सराफ असाे.

साेन्या-चांदीतील गुंतवणुकीने अनेकांना तारल्याचे उदाहरण काेराेना काळात जगभरात लाॅकडाऊन हाेता, सगळीच परिस्थिती अनिश्चित हाेती, त्यामुळे गुंतवणुकीतून हमखास परतावा देणारा पर्याय म्हणून साेन्या-चांदीकडेच गुंतवणूकदार वळले हाेते. याचमुळे दर ५६ हजारांचा विक्रमी स्तर पार झाला हाेता. मात्र निर्बंध शिथिलतेनंतर हेे दर ४७ हजारांपर्यंत खाली येऊन स्थिर हाेते. मात्र गेल्या दाेन महिन्यांपासून भाववाढ हाेत आहे. विशेष म्हणजे चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. लाॅकडाऊन काळातही अशी वाढ झाली हाेती. त्याचा फायद खरेदीदारांना आता हाेत आहे. त्यामुळेच साेने-चांदीतील हुकमी गुंतवणुकीचे चित्र बघायला मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...