आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधनाचा ठणठणाट:डिझेल टंचाईचे अजून बसणार चटके, आता 'आयओसीएल'चेही इंधन रेशनिंगचे मेसेज

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व जिल्ह्यात सध्या डिझेलचा कृत्रिम तुटवडा निर्माण झालेला असून अनेक पंपांवर केवळ पेट्राेल उपलब्ध आहे. सर्वाधिक पेट्राेलपंप असलेल्या भारत पेट्राेलियम काॅर्पाेरेशन लिमिटेड या प्रमुख तेल कंपनीकडून पुरेसा डिझेल पुरवठा हाेत नसल्याचे ही स्थिती ओढावली आहे.

यातच इंडियन ऑइल काॅर्पाेरेशन लिमिटेड (आयओसीएल) या दुसऱ्या मोठ्या कंपनीनेही बुधवारपासून इंधनाचे रेशनिंग लागू केले आहे. यामुळे येत्या काळात डिझेलच्या टंचाईची ही परिस्थिती अजून बिघडणार असून याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.

जिल्ह्यात 450 पेट्रोल पंप असून यापैकी 35 टक्के पंप हे भारत पेट्राेलियम काॅर्पाेरेशन लिमिटेडचे तर तितकेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडचे आहेत. भारत पेट्राेलियमकडून अपेक्षीत डिझेलचा पुरवठा हाेत नसल्याने जिल्ह्यात जवळपास सर्वच कंपन्यांच्या पंपावर दरराेज डिझेल संपत आहे. ही स्थिती सुधारावी याकरीता नाशिकसह मालेगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील डिलर्सने मंगळवारी कंपन्यांच्या पानेवाडी येथील डेपाेसमाेर निदर्शने केली.

मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे, बुधवारी दुसरी माेठी कंपनी असलेल्या इंडियन ऑइल काॅर्पाेरेशनचे डिलर्सला मेसेज पाठवून आम्ही इंधनाचे रेशनिंग लागू करीत असून डिलर्सला आता डिझेल आणि पेट्राेल समप्रमाणात खरेदी करावे लागेल, असे स्प‌ष्ट केले आहे. याचा थेट परिणाम डिझेलची टंचाई वाढण्यात हाेणार असून सर्वसामान्य वाहन चालकापासून ते मालवाहतुकदारांपर्यत विविध घटकाना सध्या बसत असलेली झळ वाढणार आहे.

यामुळे बिघडणार इंधन विक्रीचे गणित

पेट्राेलपंपावरून विक्री हाेणाऱ्या इंधनापैकी सर्वात जास्त विक्री डिझेलची हाेत असते. हे प्रमाण प्रती पंप सरासरी 2 हजार लिटर पेट्राेल तर 3 ते 3500 लिटर डिझेल एका दिवसासाठी असे आहे. मात्र, आता पेट्राेल-डिझेल समप्रमाणात कंपनीकडून खरेदी करावे लागेल. यामुळे डिझेलची टंचाई तर पेट्राेलची अती उपलब्धता पंपांवर असेल. प्रमुख दाेन तेल कंपन्यांकडून पुरवठ्यासाठी हात आखडते घेतल्याचा तसेच खासगी कंपन्यांनी पेट्राेलपंप अगाेदरच बंद ठेवलेले असल्याचा परिणाम इतर कंपन्यांच्या पंपांवरील भार वाढण्यात होईल व पंपावरून वेळेपूर्वीच डिझेल संपेल.

बातम्या आणखी आहेत...