आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:टाेमॅटाे घाऊक प्रति किलाे 2 तर किरकाेळ 20 रुपये

सातपूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निसर्गाच्या असंतुलनामुळे नेहमीच अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता टोमॅटोमुळे आर्थिक संकट कोसळले आहे. बाजार समितीत २० किलो टोमॅटोची जाळी अवघ्या ४० रुपयांना विकली जात आहे. म्हणजे घाऊक २ रुपये तर किरकाेळ विक्री २० रुपये प्रतिकिलाे हाेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीतून टोमॅटो काढून बाजार समितीपर्यंत आणणे आतबट्ट्याचे ठरत आहे.

रात्रंदिवस मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पीक घेतले आहे. त्यात अवकाळी पाऊस आल्याने पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले. मात्र पीक काढणीला आल्यानंतर त्यांच्या हाती तीन अंकीच रक्कम येत आहे. शेतकऱ्यांकडून ४० रुपयांना २० किलोची जाळी घेतली जात असली तरी खुल्या बाजारपेठेत मात्र ग्राहकांना वीस रुपये किलो याप्रमाणे टोमॅटोची विक्री केली जात आहे.

राजकारणामुळे शेतकऱ्यांचा मुद्दा दुर्लक्षित : एकीकडे शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल किमतीत कृषी मालाची विक्री करावी लागत आहे. दुसरीकडे मात्र राजकारण्यांकडून हे मुद्दे दुर्लक्षित केले जात आहे. ‘सावरकरांची माफी’ ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे मुद्दे उपस्थित करून राजकारण केले जात असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणीच वाली नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहे.

सव्वादोन लाख खर्च, हाती येणार २५ हजार
आम्ही दीड एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. अवकाळी पावसामुळे या क्षेत्रावर आत्तापर्यंत सव्वादोन लाख रुपये खर्च करण्यात आला. मात्र टोमॅटोला भाव मिळत नसल्याने आमच्या हाती केवळ २५ हजार रुपयेच येतील अशी परिस्थिती आहे. - शांताराम चव्हाण, शेतकरी, वासाळी

बातम्या आणखी आहेत...