आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅम्पस भरती:काैशल्य विकास व रोजगार केंद्रातर्फे उद्या कॅम्पस भरती

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. १४) सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत कॅम्पस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांकरिता कॅम्पस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील महिंद्रा कंपनीत आयटीआय झालेले वेल्डर, फीटर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांची १५० पदांसाठी कॅम्पस भरतीमधून मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. कॅम्पस भरतीचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय, सातपूर परिसर या ठिकाणी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...