आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Torrential Downpour In Some Places In The State, Where Light Rain Forecast; Chance Of Rain With Wind In Marathwada Vidarbha |marathi News

मान्सून:राज्यात काही ठिकाणी मुसळधार, कुठे हलक्या पावसाचा अंदाज; मराठवाडा-विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

नाशिक14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारी कोकणासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडला.

मान्सून देशात हळूहळू सर्वत्र दाखल होत आहे, मात्र अनुकूल वातावरण नसल्याने तो दमदार बरसत नाही. एकीकडे मान्सून पुढे सरकत आहे, मात्र पाठीमागे पाऊस होत नसल्याने खरीप हंगाम धोक्यात सापडला आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी पश्चिम बंगालसह झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात पुढे सरकत प्रगती केली आहे. आगामी तीन दिवसांत ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...