आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या रामकुंड परिसरात राेजच माेठ्या संख्येने भाविक, पर्यटक येत असतात. मात्र या परिसरात थेट रस्त्यावरच उभ्या केलेल्या रिक्षा, दुकानांचे अतिक्रमण यामुळे या ठिकाणी वाहतूक काेंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे या ठिकाणांहून पायी चालणेही अवघड बनले आहे. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर पाेलिस चाैकी असूनही या वाहतूककाेंडी पाेलिसांकडे साेईस्कर दुर्लक्ष केले जात आहे.
रामकुंडाचे असणारे महत्त्व तसेच परिसरात असणारे विविध मंदिरे यामुळे राेजच या ठिकाणी पर्यटकांसह भाविकांनी माेठी गर्दी हाेत असते. या दृष्टीने वाहतुकीचे नियाेजन करणे गरजेचे असतांना पालिकेसह वाहतूक पाेलिसांकडून याकडे साेयीस्कर दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. परिणामी कपालेश्वर मंदिराच्या समाेरील परिसरात वाहतूककाेंडी निर्माण हाेऊन वाहनांच्या लांबचलांब रांगा असतात. परिणामी वाहनधारकांना या ठिकाणाहून जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघाताची देखील शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रारी करूनही याबाबत ठाेस उपाययाेजना न झाल्याने वाहतूक विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पालिकेची अतिक्रमण माेहीम ठरली देखावा पालिकेच्या वतीने रामकुंड, गाेदाघाट परिसरात काही दिवसांपूर्वी अतिक्रमण माेहीम राबविण्यात आली हाेती. मात्र पुन्हा या परिसरात जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे देऊन या परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.