आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक कौशल्य प्राप्ती:टोयोटा किर्लोस्कर मोटार देणार पॉलिटेक्निकच्या 20 विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टोयोटा किर्लोस्कर मोटार आता पॉलिटेक्निकच्या 20 विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणार आहे. तंत्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य प्राप्त व्हावे या उद्देशाने टोयोटा किर्लोस्कर मोटार यांच्याकडून हा उपक्रम राबवला जातोय.

टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यातर्फे संदीप फाऊंडेशन संचलित संदीप पॉलिटेक्निक महाविद्यालयात मार्च 2016 पासून अत्याधुनिक ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यासाठी काॅलेज आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहेत. त्यानुसार टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत दरवर्षी २० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या प्रशिक्षणात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना संदीप पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सैद्धांतिक व प्रात्यक्षिक यांचे प्रशिक्षण दिले जाते.

पाॅलिटेक्निक डिप्लोमा झाल्यानंतर या प्रशिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना आॅटोमोबाईल क्षेत्रात नोकरी व व्यवसाय करताना होतो. आतापर्यंत सुमारे 100 हून अधिक विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण सत्रात सहभाग घेतला आहेत.

टोयोटा टेक्निकल एज्युकेशन कार्यक्रमा अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022-2023 च्या नवीन बॅचच्या निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या विद्यार्थ्यांमध्ये भावेश पाटील, गौरव देवरे, गुणवंत घोलप, हर्षल पाटील, हेमंत देवरे, मयुरेश भालेराव, प्रतीक्षा गांगुर्डे, रेश्मा बेंडकोळी, उर्मिला पवार, निखिल कांबळे, प्रशांत देशमुख, प्रथमेश साळवे, रोहन गांगुर्डे, साहिल गांगुर्डे, संकेत पवार, तुकाराम बेंडकोळी, यश थोरात, यश शहाणे, यशवंत गायकवाड यांच्यासह एकूण 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रशिक्षण सत्राचे उदघाटन वासन टोयोटाचे व्यवस्थापक (ग्राहक सेवा) श्रीकांत नायक यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.पंकज धर्माधिकारी, विभागप्रमुख जे. आर. वाडिले, टोयोटा ट्रेनर प्रा. महेश थोरात, वासन टोयोटा येथील टेक्निकल लीडर संतोष सानप आदी उपस्थित होते. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संदीप फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. संदीप झा, विशेष अधिकारी प्रा. प्रमोद करोले यांचे मार्गदर्शन लाभले.

बातम्या आणखी आहेत...