आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मोबाइल चोरी गेल्यास स्वत: करा ट्रॅक

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबइल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तो शोधणे कठीण असते. वैयक्तिक माहिती चोरीला जाण्याचीआणि या माेबाइलमध्ये नवीन सिमकार्ड टाकून ताे विक्री होऊ शकतो. काही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते, या सर्व प्रकारालाआळा घालण्यासाठी शासनाने सीइअायअार (सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी सिस्टिम) सुरू केलीआहे. याद्वारे हरवलेले, चोरी झालेले मोबाइल मिळवता येणारआहे.

मोबाइल हरवला, चोरीला गेला तर आयएमइआय नंबर रजिस्टर करून ट्रॅक करणे शक्यआहे. सिमकार्डही ब्लॉक करत दुसरे सिमकार्ड मोबाइलमध्ये टाकले तर पोलिस मोबाइल ट्रॅक करतात. या सुविधेमुळेआता ग्राहकांनाहीआपला चोरी गेलेला मोबाइल शोधणे सोपे होणारआहे. सरकारने CEIR संकेतस्थळ सुरू केले आहे. या वेबसाइटवर सविस्तर माहिती दिली आहे.

..असे करा लाॅगइन
प्रथम चोरी गेलेला मोबाइल ब्लॉक करण्यासाठी https://www.ceir.gov.in/Home/index.jsp या संकेतस्थळावर भेट द्या. मुख्य पृष्ठावर, ब्लॉक स्टॉलेन / गमावलेल्या मोबाइलचे लाल रंगाचे बटण दिसेल. एक फॉर्म येईल. यामध्ये मोबाइल नंबर, आयएमइआय १ / आयएमइआय २ फोन कंपनी आणि मॉडेल, फोन बिल, माहिती भरावी. सबमिट करा. अन-ब्लॉक करण्यासाठी वेबसाइटवर ग्रीन बटण असेल. या बटणावर क्लिक केल्यानंतर फार्म येईल. फोन ब्लॉक करण्यासंबंधी प्राप्त झालेली विनंती भरावी लागेल. ब्लॉकच्या वेळी दुसरा मोबाइल नंबर दिल्यास त्यावर ओटीपीआल्यानंतरऑनलाइन फाॅर्म सबमिट करा.

बातम्या आणखी आहेत...