आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळवण वणी रस्त्यावर भीषण अपघात:ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली 6 मजूर जागीच ठार, कार मधील 4 जण बचावल

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रॅक्टरला दोन ट्राॅली जोडून मजुर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ट्राॅली मधील 6 मजुर ठार झाले तर 12 जण गंभीर जखमी झाले. ट्राॅली कारवर उलटत असतांना कार मधील चौघांनी वेळीच बाहेर निघाल्याने मोठी दुर्घटना टळली. गुरुवारी (ता. 2) दुपारी 3 वाजता कळवण वणी रोडवरी मुळाणे बारी येथे हा अपघात घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रस्त्याचे काम करणारे मजुर घेऊन जात असतांना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. ट्रॅक्टरला दोन ट्राॅली जोडलेल्या असल्याने मागील ट्राॅली उलटत असतांना कार चालकाच्या लक्षात आले. त्याने तत्काळ कार मधून उड्या घेत रस्त्याच्या बाजुला पडले. तेवढ्यात ट्राॅली कारवर उलटली. यात ट्राॅली मध्ये बसलेले 15 ते 20 मजुर खाली पडले यात डोक्याला गंभीर मार लागून 6 मजुर जागीच ठार झाले. 12 मजुर गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी मजुरांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. रात्री उशिरा पर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

बातम्या आणखी आहेत...