आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:निर्यातवृद्धीसाठी डिसेंबरमध्ये राज्यात ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पो ; उद्योगमंत्री सामंत यांची माहिती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील व्यापार व उद्योगांचा विकास व्हावा तसेच निर्यातवृद्धी व्हावी यासाठी २ ते ११ डिसेंबर २०२२ असे दहा दिवस महाराष्ट्र ट्रेड इंटरनॅशनल एक्स्पोचे आयोजन केले गेले आहे. महाराष्ट्र चेंबर, महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग व एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन होणार असून उद्योग विभाग व महाराष्ट्र चेंबरतर्फे निर्यातवृद्धी करण्यासाठी राज्यामध्ये जिल्हास्तरावर इंडिया यूएसए डेव्हलपमेंट फोरम अंतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उद्योग मंत्री उदय सामंत यांची मंगळवारी (दि. ६) भेट घेतली. याप्रसंगी अध्यक्ष गांधी यांनी चेंबरच्या कार्याची माहिती देऊन जागतिकस्तरावर राज्यातील व्यापार उद्योगाला संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. नुकताच अमेरिका दौऱ्यात झालेल्या बिझनेस समिटची माहिती दिली. भारत-अमेरिका व्यवसायवृद्धीसाठी इंडिया यूएसए डेव्हलपमेंट फोरमची स्थापना करण्यात आल्याचे सांगितले. या एक्स्पोमध्ये विविध देशांचा सहभाग राहणार असून भारतातील अन्य राज्य सहभागी होणार आहेत. या दहा दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात तज्ज्ञांचे मार्गदर्शन व केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यापार उद्योगांविषयीच्या योजनांची माहिती सेमिनारद्वारे देण्यात येणार आहे. या एक्स्पोमुळे राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे या एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासन, उद्योग विभाग व एमआयडीसी यांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले. शिष्टमंडळात विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष रवींद्र मानगवे, एन्ट्री इंडियाचे नवीन पाठक, प्रभारी सहकार्यवाह सागर नागरे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...