आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप:द्वारका परिसरात पुन्हा वाहतूक ठप्प; वाहतूक कोंडी निर्माण झालेली असताना वाहतूक पोलिस मात्र गायब

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या जाणाऱ्या द्वारका परिसरात शनिवारी (दि. ११) दुपारी वाहतुकीचा बोजबारा उडाला. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होऊन परिसरात एक ते दाेन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत होते. विशेष म्हणजे वाहतूक कोंडी निर्माण झालेली असताना वाहतूक पोलिस मात्र गायब असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात होता.

मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्याबरोबरच द्वारका परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मोठा गाजावाजा करत महामार्गावर उड्डाणपूल साकारण्यात आला. मात्र, त्यानंतरही द्वारका परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा अद्यापही कायम आहे. शनिवारी दुपारी पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. साधारणत दोन-अडीच तास वाहतूक ठप्प होती. वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहतूक पोलिस नसल्याने काही वाहनधारकांनी स्वतः रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...